राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात केंद्र सरकारच्या आणि पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली

पुणे शहर भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उप संपादक )

पुणे :  आज होळी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात केंद्र सरकारच्या आणि पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या नावाने बोंब मारली.

राष्ट्रवादी काँग्रेस नंतर पुणे शहर भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर  टीका केली.

 हे सरकार सामान्य माणसांवर अन्याय करत आहे. सरकारला आमदारांचा निधी वाढवण्यासाठी, ड्रायव्हरचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत. एसटी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत. त्यामुळे या सर्व वाईट प्रवृत्तीची होळी आज पुण्यातील भाजप कार्यालयात करण्यात आली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post