विशेष वृत्त : बालगंधर्व पुणे येथे दिग्गजांचा जीवनगौरव सत्कार समारंभ सोहळा संपन्न.

खासदार श्रीनिवास पाटील व पत्रकार श्री मधुकर भावे यांच्या सत्कार गौरव सोहळ्यास शरदचंद्र पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख : 


रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काल  पुण्यात  महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा , या संस्थेच्या वतीने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमात सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा मा. शरदचंद्र पवार, राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, मा. सुशील कुमार शिंदे,तसेच तामिळनाडू राज्यपालांचे मुख्य सचिव आनंदराव वी पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचा पूर्ण आढावा प्रेस मीडिया लाईव्ह पुणे शहर प्रतिनिधी जिलानी उर्फ मुन्ना शेख यांनी घेतला.

खासदार श्रीनिवास पाटील  आणि आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

 आपला दोघांचा आयोजित केलेला सत्कार गौरव कार्यक्रम हा कृतज्ञता सोहोळा म्हणजे एक अभूतपूर्व कपिलाडीचा योग आहे .ठाम विचारधारा संगत - संयमित अभिव्यक्ती आणि अफाट लोकसंग्रह ही आपणा दोघांची समान जीवनवैशिष्ट्य म्हणजे आपणा दोघांच्या आजपर्यंतच्या आयुष्य प्रवासातले हे कर्तृत्वाचे हिरेजडित रत्नहार आहेत .

या प्रसंगी श्रीनिवास पाटलांनी आपल्या जीवनातील राजकीय घडामोडी ते आज पर्यंतचा प्रवास संशिप्त रुपात सांगितले. माझ्या आयुष्यात मी 34 वर्ष नोकरी केली. 1999 मध्ये शरद पवारांनी मला बोलावलं. त्यावेळी मला काही कल्पना नव्हती. त्यांनी मला राजीनामा देण्यास सांगितला आणि मी दिला, आणि अशी राजकारणातील वाटचाल सुरू झाल्याचं पाटलांनी यावेळी सांगितलं. शरद पवार हे पौर्णिमेचा चंद्र आहेत, ते आमच्या बरोबर आहेत, ते म्हणतील तिथे उडी मारायची, पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण,असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.त्यानंतर 1999 आणि 2004 ला मी दोनदा खासदार झालो. आणि मी राज्यपाल ही झालो, असं म्हणत पाटलांनी आपल्या जुन्या आठवणींना स्मरण करत आपले मनोगत व्यक्त केले.


प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख

Post a Comment

Previous Post Next Post