अन्नपूरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

 आयएससो नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची  पाहणी केली 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख

पुणे, मुळशी दि. २७ मार्च   राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दौऱ्यावर असतांना त्यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पाहणी केली. 


यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्या असल्याचे आढळून आले.


प्रेस मीडिया लाईव्ह

  ( सह संपादक अन्वरअली )

Post a Comment

Previous Post Next Post