अब्दुल गफूर पठाण यांचे नगरसेवक पद आयुक्तांनी तातडीने रद्द करावे

 उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्त्यांनी केली  मागणी

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :कोंढवा येथील नगरसेवक अब्दुल गफूर अहमद पठाण यांचे जात वैधता प्रमाणपत्रा बाबत पडताळणी समितीचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने खारीज केल्यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि त्यांचे नगरसेवक पद भूतलक्षी प्रभावाने रद्द झाले आहे आणि त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार  ते ६ वर्षे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र  ठरत आहेत..त्यांचे नगरसेवक पद पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तातडीने रद्द करावे,अशी मागणी याचिकाकर्ते महंमद हुसेन इसहाक खान आणि मदन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. मंगळवारी श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. याबाबतचे पत्र त्यांनी ४ मार्च रोजी आयुक्तांना दिले आहे. 

कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७-अ मधून २०१७ ची महानगरपालिका निवडणूक अब्दुल गफूर महमद पठाण यांनी लढवली आणि जिंकली. हा प्रभाग इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असताना पठाण यांनी वडार जातीतील दगडफोडू पोटजातीचे प्रमाणपत्र जोडले होते. हे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र समिती पुणे यांनी वैध ठरविले होते.या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे महंमद हुसेन इसहाक खान,मदन शिंदे यांनी आव्हान दिले  होते. या खटल्यात एड.सुगंध देशमुख यांनी महंमद हुसेन खान यांची बाजू मांडली तर एड.अनिल अंतुरकर,एड.संदीप पाठक यांनी मदन शिंदे यांची बाजू मांडली.न्यायालयाने गफूर पठाण यांचे जात  प्रमाणपत्र २४ फेब्रुवारी २०२२ च्या निकालाद्वारे  रद्द केले आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ,बॉबे प्रोव्हीन्सियल म्युनिसिपल एक्ट कलम १० उपकलम १ सी प्रमाणे गफूर पठाण यांची निवड  अवैध ठरविण्यात येऊन पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी,त्यावर आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन न्यायालयाच्या निर्णयाची बूज राखावी,अशी मागणी महंमद हुसेन खान आणि मदन शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्तांकडे केली आहे.यासंबंधी राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार (१७ नोव्हेंबर २०१९)पान क्र २ वर कलम १६ -१ क नुसार जात प्रमाणपत्र अवैध  ठरल्यास,रद्द ठरल्यास  पालिका सदस्याचे  पद त्याच  दिनांकापासून रिकामे केले असे समजण्यात येईल ,पोटकलम ब नुसार राज्य सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या व्यक्तीस पालिका सदस्य असण्यास किंवा निवडून येण्यास ६ वर्षे  अनर्ह ठरविल,असा स्पष्ट उल्लेख आहे,असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  

गफूर पठाण यांना खोटे जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी आणि खऱ्या ओबीसींना न्याय मिळावा,अशीही मागणी  याचिकाकर्ते मोहम्मद हुसैन खान आणि मदन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली गफूर पठाण यांच्या फसवेगिरीच्या विरोधात ५ वर्षे न्यायालयीन लढा देताना माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला.अज्ञात व्यक्तींनी दोनवेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला,याविरोधात २०१८,२०१९ मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंद झालेले आहेत,या तक्रारींचा तातडीने तपास करून संशयिताना पकडून शिक्षा करावी,अशी मागणीही मोहम्मद हुसैन खान  यानी या पत्रकार परिषदेत केली. 

'गफूर पठाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे.निवड अवैध ठरली आहे, जात प्रमाणपत्र समितीला ३ महिन्यात अहवाल देण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली​ आहे . ​



Post a Comment

Previous Post Next Post