अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले काय निर्णय घेतात या कडे आता महाराष्ट्राचे लक्ष..
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे शहरातील अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अखत्यारीत येणा-या बर्याच परिमंडळ कार्यालय पारदर्शकतेच्या नावाखाली आतून पिळवणूक करण्यात येते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याला कर्मचारी देखील कारणीभूत आहेत. तर काही कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचे अनेक उदाहरणे अन्नधान्य वितरण कार्यालयात पाहायला मिळतात, त्यासाठी राजकीय लोकांच्या उंबरठ्यावर देखील चकरावर चकरा मारायला ह्या कर्मचारी तयार असतात, आणि राजकीय दबाव आणून वरिष्ठांची खिल्ली उडवत आपल्या पदाचा गैरवापर करने देखील उघड डोळ्यांनी पाहायला मिळाले आहे. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात काम करून नागरिकांना दमबाजी,बे-शिस्त, उधध्ट पणे बोलने, अरेरावी करणारे कर्मचारी यांना कोणाचा आश्रय.....आहे..?याचे गूढ उलगडले पाहिजे.
शहरात एका महिला कर्मचाऱ्याची पुन्हा अन्नधान्य वितरण कार्यालया व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या बदलीला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. आशा स्वामी ह्या सद्ध्या अन्न धान्य वितरण कार्यालयात कार्यरत असून ते ई" परिमंडळ कार्यालयात क्लार्क असताना त्यांच्या विरोधात ब-याच तक्रार दाखल होत्या. तसेच पुरवठा निरीक्षकांच्या कामात ढवळाढवळ करणे, अधिकार नसताना नागरिकांच्या घरी जाऊन शिधापत्रिकेबाबत तपासणी करणे, परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे, पत्रकारांना व सामाजिक कार्यकर्त्यांना आतील बातम्या पुरविणे, मी बोलेन तेच झालं पाहिजे, अश्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिक तर नागरिक अधिकारी देखील वैतागले होते. त्यांच्या विरोधात ब-याच तक्रारी पुणे जिल्हाधिकारी, उपायुक्त पुरवठा शाखा, अन्न धान्य वितरण कार्यालयात झाल्याने अखेर वरिष्ठांना ई" परिमंडळ कार्यालयातून बदलीचा निर्णय घ्यावा लागला होता, तर आता एका वर्षानंतर पुन्हा त्यांची बदली ब"ग"ड" परिमंडळ कार्यालयात होणार असल्याने जनहित लोकसेवा फाऊंडेशनने व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
स्वामी यांनाच पुन्हा पुन्हा परिमंडळ कार्यालयात बदली करण्याचे कारण काय ? याची देखील वरून सखोल चौकशी करण्यात यावी आजू बाजूच्या परिमंडळ कार्यालय व कर्मचारी वेळेवर नागरिकांचे प्रश्न सोडवत नाही अशा कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्या,गोर गरीबांचे हक्काचे लचके तोडून एजंट गिरीला शय देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने पुन्हा कठोर पावले उचलावी, साशनाचा पगार घेऊन सुद्धा गरजू नागरिकांची गैरसोय करून त्यांना काहीतरी अडथळे दाखून त्यांची कामे एजंट मार्फत करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज बुलंद करणारे सेवा भावी संस्था आता पुढे आले आहे,तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारीने आपले कामे करण्याची नियमावली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.
दुसऱ्या कर्मचाऱ्यांना संधी का दिली जात नाही..?असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच परिमंडळ कार्यालयात ज्याच्या जाण्याने अधिकारी व कर्मचारी ना खुश असतील तर त्यांची बदली करण्याचे कारण काय...?
असे अनेक प्रश्न जनहित लोकसेवा फाऊंडेशनने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर त्यांची बदली अन्नधान्य वितरण कार्यालया (एफडीओ) व्यतिरिक्त इतरत्र परिमंडळ कार्यालयात करू नये अन्यथा आंदोलन केले जाईल असेही दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आता या बद्दल अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले काय निर्णय घेतात या कडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे..