प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राचा अवमान केला , तसेच काँग्रेस मुळे कोरोना सर्वत्र पसरला आहे, असे वक्त्व्य केले होते. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींना येत्या 6 तारखेला काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार असल्याची माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माझी अध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
या वेळी रमेश बागवे म्हणाले की, प्रवीण दरेकर खोटे बोलत असतात त्यानी विकास तर काहीच केलेला नाही. . मेट्रोची मूळ कल्पना काँग्रेसची आहे. भाजपने केंद्रात आणि शहरात बहुमत असूनही एकही विकास काम केल नाही. मोदींचा दौरा हा राजकीयच आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर रमेश बागवे यांनी केली.