प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख (उप संपादक )
पुणे दि . १३ पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. 17 छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय हॉल भव्य इमारतीचा व महाराणा प्रताप दूध व्यवसाय केंद्र उद्घाटन व लोकार्पण समारंभ रविवार दिनांक 13 मार्च रोजी दु.4 वा. गणेश पेठ येथे संपन्न झाला.
महाराणा प्रताप दूध व्यवसाय केंद्र भव्य इमारतीचा लोकार्पण सचिन अहिर मा. राज्यमंत्री संपर्क प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.सचिन अहिर . (मा. राज्यमंत्री संपर्क प्रमुख महाराष्ट्र,) व्यासपीठावरून आपले मत व्यक्त करताना म्हणाले दूध व्यवसायाला ब्रॅण्डिंग पद्धतीने करण्याची आज काळाची गरज आहे , आणि आधुनिक युगात दुधाचा दर्जा सुधारण्यावर भर दिले पाहिजे.विषाल धनावडे (नगरसेवक प्रभाग क्र. 17 पुणे महानगरपालिका ) या ठिकाणी म्हणाले मी प्रभागांमध्ये 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्यावर भर देणार आहे, बहुउद्देशीय हॉल आणि महाराणा प्रताप दूध व्यवसाय केंद्र या भव्य इमारतीसाठी सुरुवाती पासूनच पाठपुरावा केला आणि आज माझी स्वप्नपूर्ती या ठिकाणी झालेली आहे विशाल धनवडे यांनी दूध व्यवसायिकांना व सर्वांना शुभेच्छा देत या नवीन इमारतीमध्ये आधुनिक पद्धतीचा तंत्रज्ञान वापर केला पाहिजे असे आव्हान केले.
त्यावेळी गजानन पंडित ( कसबा शहर संघटक), संजय मोरे ( शहर प्रमुख), गजानन थरकुडे ( शहर प्रमुख), पल्लवी जावळे(नगरसेविका प्रभाग क्र. 16), जावेद खान ( मा. विभागप्रमुख), सोहम दत्तात्रय जाधव ( शिवसैनिक ) आदी कार्यकर्ते जनसमुदाय उपस्थित होते.