क्राईम न्यूज : 30 हजार रुपयांची लाच मागून 17 हजार रुपये लाच घेताना पुणे मनपाचा कॉन्ट्रॅक्टरला (खासगी व्यक्ती) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उप संपादक)

पुणे : पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागून 17 हजार रुपये लाच घेताना  पुणे मनपाचा कॉन्ट्रॅक्टरला  (खासगी व्यक्ती) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.महेश तानाजी शिंदे  (वय-46) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कॅन्ट्रॅक्टरचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही  कारवाई आज मंगळावार केली.

 पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे   या बाबत 54 वर्षीय व्यक्तीने  तक्रार केली. तक्रारदार यांच्या संबंधितांच्या मिळकती मध्ये पाण्याचे कनेक्शन देण्याकरता तक्रारदार यांनी पुणे महापालिकेत अर्ज केला होता. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी महेश शिंदे याने तीस हजार रुपयाची लाच मागितली होती. त्यापैकी 15 हजार रुपये त्याने सुरुवातीला घेतले होते.

यानंतर उर्वरित 15 हजार रुपये शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे मागितले. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे महेश शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली. पुणे एसीबीने  तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी महेश शिंदे यांने सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता  मनपा पुणे यांना पैसे द्यावे लागतात असे म्हणून 17 हजार रुपयाची लाच मागितली. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना आरोपी महेश शिंदे याला रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता संगोलकर पोलीस निरीक्षक भारत साळुंखे , पोलीस हवालदार अयाचित, पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकूर यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post