पिंपरी चिंचवड येथे लिव्ह ऍन्ड रिलेशनशीप मध्ये राहत असलेल्या तरुणीचा खून; पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

 लिव्ह ऍन्ड रिलेशनशीप मध्ये राहत असलेल्या तरुणाईचा फसवणूक व त्यातून गुन्हेगारीकडे वळण...

प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख


पिंपरी चिंचवड दि.८ आकुर्डी परिसरातील विठ्ठल वाडी या ठिकाणी तरुण-तरुणी लिव्ह ऍन्ड रिलेशनशीप मध्ये राहत असलेल्या तरुणीचा खून करण्यात आला. ही घटना विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रविवारी दि.६ सकाळी उघडकीस आली आहे. तरुणी आणि तिची आई आपल्याला ब्लॅकमेल करीत असल्याने खून केला असल्याची कबुली आरोपी श्‍याम राजू ढेरे रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी. मूळ रा. जालना यांनी पोलिसांना दिली.खून केल्यावर रितू हिचा मृतदेह घरातील शौचालयात लपवलं. त्यानंतर दोन दिवसांनी आरोपी ढेरे याने घरमालकाला फोन करून घरात मृतदेह असल्याबाबतचे सात मेसेज केले. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना बोलावून पाहूणी केली असता खूनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे.

रितू भालेराव वय २० असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी घरमालक प्रथमेश दीपक दरेकर वय २५ यांनी रविवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्‍याम राजू ढेरे रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी. मूळ रा. जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.पुढील तपास निगडी पोलीस करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post