फोन टॅपींग प्रकरणात आता नवनवे खुलासे होऊ लागले



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : फोन टॅपींग प्रकरणात आतानवनवे खुलासे होऊ लागले आहेत. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.जसजसा तापास पुढे जाईल तसा तसा अनेक  नवनवीन माहिती बाहेर येऊ लागली आहे.  हाती आलेल्या माहिती नुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  माजी खासदार संजय काकडे , माजी आमदार आशिष देशमुख  आणि मंत्री बच्चू कडू यांचे फोन वेगवेगळ्या नावांनी सलग 60 दिवस म्हणजेच दोन महिने टॅप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अप्पर गृह सचिव यांच्याकडे या चारही फोनचे क्रमांक टॅपिंगसाठी पाठवताना त्या सोबत 'कस्टमर ऍप्लिकेशन फॉर्म' (सीएएफ) जोडला नसल्याचेही तपासात पुढे येत आहे. त्यामुळे हे फोन नेमके कोणाच्या नावावर आहेत ..? हे अद्याप समजू शकले नसल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात विविध नेत्यांच्या झालेल्या फोन टॅपींगचा कालावधीही दिला आहे. त्यानुसार, नाना पटोले- 18 सप्टेंबर 2017 ते 14 नोव्हेंबर 2017, बच्चू कडू- 18 सप्टेंबर 2017 ते 14 नोव्हेंबर 2017, संजय काकडे- 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018, आशिष देखमुख- 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018 या काळात या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणात पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post