पोलिसांन समोर या प्रकरणाचे गुड उलगडण्याचा आवाहन.. आयुक्त कृष्ण प्रकाश
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि. ३१ हिंजवडी परिसरात मान आय.टी. जवळच असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नदीच्या कडेला असलेल्या झाडाच्या एका फांदी वर महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.. रमेश गेहलोत नावाच्या व्यक्तीकडून मिळाल्या माहिती मुळे ही घटना पोलिसांना समजताच ताबडतोब पोलिस पथक या ठिकाणी दखल झाले स्वत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी येऊन पाहणी केली. मुळा नदीच्या काठावर महिलेचा मृतदेह झाडाला वाळलेल्या अवस्थेत लटकलेला होता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, ओळख पटवणे कठीण होत आहे. हा मृतदेह झाडाच्या फांदीवर वाळलेल्या अवस्थेत कित्येक महिन्यापासून याठिकाणी असण्याची शक्यता आहे. पोलिसांना यामागील सर्व गुड शोधून काढने एक आव्हानच असणार आहे, मृत महीलेचे वय २० ते २१ वर्ष असन्याचा अंदाज वेक्त केला जात आहे. मृतदेह या ठिकाणी झाडावर कसा आला ? हे गूढच आहे मृतदेहाचे डीएनए चाचणी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच काही महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतील अशी माहिती देण्यात आलेली आहे.