गरिबांचा कैवारी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले .. उपायुक्त सचिन ढोले.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड दि.३१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती प्रेस मीडिया लाईव्हला पत्रकाद्वारे मिळालेली आहे .
शासकीय अधिकाऱ्यांची नेहमी बदली होत असते , परंतु आपल्या कामाचा ठसा उमटवून जाणारे अधिकारी काही मोजकेच असतात त्या पैकी एक अधिकारी म्हणजे सचिन ढोले कर्तव्यदक्ष अधिकारी गरिबांचा कैवारी म्हणून अशी ख्याती असलेले या पूर्वी पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली होती, कोरोना काळात त्या भागामध्ये अति खेड्यापाड्यां मध्ये सरकारी मदत पोहोचवणारे अधिकारी म्हणून सचिन ढोले यांची ओळख आहे, पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना अशा शांत स्वभाव असलेले व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सचिन ढोले यांचा नक्कीच लाभ होणार आहे.