बारा गावात एक दफन-भूमी च्या 21 वर्ष जुन्या मागणीला महापालिकेकडून उदासीनता ...कबरस्तान संघर्ष समिती
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख : सह संपादक :
पिंपरी दि.२५ काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरातील मुस्लिम नागरिकांना मृत्यु देह दफन करण्यासाठी जागा मिळावी यासाठी कबरस्तान संघर्ष समितीच्या वतीने मागील 21 वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे .
या बाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेशी कबरस्तान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्याशी देखील मागील सहा महिन्यांमध्ये दोन वेळा या विषयावर बैठका झाल्या त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली परंतु संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मुस्लीम समाजाच्या आणि आयुक्त राजेश पाटील यांची दिशाभूल करीत आहे अशी घणाघाती टीका कबरस्तान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे .शहरी भागामध्ये मुस्लिम बांधवांना दफन-भूमी साठी जागा उपलब्ध करून देणे हे कायद्यानुसार महापालिकेला बंधनकारक आहे.
मुस्लिम बांधवांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये .....सिद्दिक शेख.
आज पर्यंत या विषयावर महापालिकेने निंवळ वेळकाढूपणा ची भूमिका घेतली आहे असा आरोप कबरस्थान संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केला आहे. सध्या महापालिकेवर प्रशासक नेमणूक झालेली आहे, आता आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासक या नात्याने स्वतःच्या अधिकारात काळेवाडी थेरगाव वाकड परिसरातील मुस्लिम नागरिकांना दफन-भूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी दिनांक 25 मार्च दुपारी तीन वाजता महानगरपालिका भवनासमोर तिरडी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कबरस्तान संघर्ष समितीचे समन्वयक सिद्दिक शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रेस मीडिया लाईव्ह
( सह संपादक अन्वरअली )