पिंपरी चिंचवड मनपावर प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती

 


प्रेस मीडिया लाईव्ह

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड महापालिकेवर 13 मार्चपासून प्रशासक; प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज आदेश दिले आहेत.


राज्य निवडणूक आयोगाने  मार्च - एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे 

भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३U तसेच , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १ ९ ४ ९ मधील कलम ६ , ६ ( अ ) मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही .

 १३.०३.२०२२ रोजी मुदत संपत असलेल्या पिंपरी - चिंचवड महानगरपालिका येथे प्रशासक पदी आयुक्त , पिंपरी - चिंचवड महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे,


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post