पुणे मुंबई रेल्वे मासिक पास सुविधा व जनरल टिकिट सेवा पूर्ववत रेल्वे प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना यश प्राप्ती



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :पठाण एम एस

पिंपरी चिंचवड-रेल्वे प्रवासी संघ,   यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले असून मागील काही महिन्यांपासून बंद असलेले पुणे मुंबई रेल्वे मासिक पास व जनरल तिकिट सुविधा पूर्ववत सुरु होणार  असल्याची माहिती पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिलेली आहे.


 कोरोना काळात नियमित पुणे-मुंबई प्रवास व मासिक पास बंद करण्यात आले होते दरम्यान कोरोना जसजसा आटोक्यात येऊ लागला तसे काही अटींवर रेल्वे प्रवासी सेवा सुरु करण्यात आली मात्र पुणे मुंबई रेल्वे प्रवासासाठी मासिक पास व जनरल तिकिट सेवा सुरु न झाल्याने रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड व इतर यांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता .

 या मागणीला यश आले असून 22 मार्च 2022 पासून मासिक पास व जनरल तिकिट सेवा पूर्ववत सुरु होणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी प्रवाश्यांना आवाहन करताना शासनाच्या नियमांचे पालन करा, आपल्या हलगर्जीपणामुळे पुन्हा सेवेत व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या असे म्हंटले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस


सह संपादक अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post