मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तरी दफनभूमीचा प्रश्न सोडवतील काय..?
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि. १३ काळेवाडी थेरगाव वाकड परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. परंतु शहरी वाढती लोकसंख्या पाहता प्रमुख्याने मुस्लिम समाजाची याठिकाणी दफनभूमी ची मागणी नवी नाही, आपापल्या भागातील जनप्रतिनिधी ते पिंपरी चिंचवडमहापालिका आणि आमदारा पर्यंत पाठपुरावा करून सुद्धा स्थानिक पातळीवर मुस्लीम दफनभूमीचा प्रश्न सुटताना दिसत नाही त्यामुळे या भागातील मुस्लिमांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्रकाद्वारे मागणी केली आहे.
कबरस्तान संघर्ष समिती या भागातील मुस्लीम दफनभूमीच्या मागणीसाठी हल्ली अग्रसर राहून वारंवार महापालिकेत पाठपुरावा केला, काळेवाडी वाकड थेरगाव परिसरातील मुस्लिम बांधवांनी स्थानिक जनप्रतिनिधी आमदार खासदार महानगरपालिका असा सर्व प्रवास करून सुद्धा दफनभूमी चा प्रश्न प्रलंबितच आहे.अद्याप कुठलाच तोडगा निघताना दिसत नाही. म्हणून या भागातील मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक हजार पत्रके पाठवण्याचा उपक्रम राबवला आहे.पत्रकात असं नमूद करण्यात आलेलं आहे की या गंभीर विषयाकडे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावं आणि या भागातील मुस्लिम बांधवांचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा मुस्लिम समाजातर्फे व्यक्त करण्यात येत आहे .