बारा अंकी नंबर नोंद करून तात्काळ शिधापत्रिका वैद्यकीय कारणास्तव दिली.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि. २८ रोजी निगडी येथील परिमंडळ कार्यालय निगडी (रेशन कार्ड ऑफीस) येथून अग्रवाल, यांना वैद्यकीय कारणास्तव ( किडनी बाद झाली असल्याने डायलेसिस चालू करण्याकरिता ) तात्काळ RCMS मध्ये बारा अंकी नंबर नोंद करून तात्काळ शिधापत्रिका देण्यात आली.
निगडी येथील परिमंडळ अधिकारी दिनेश नामदेव तावरे यांनी तत्काळ दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय कामा मध्ये शिधा पत्रिका नसल्या मुळे कुठला ही अडथळा होऊ नये म्हणून तत्काळ एका दिवसात बारा अंकी रेशनकार्ड जारी केले. परिमंडळ कार्यालयातील कर्मचारी यांना गोर, गरीब, गरजू नागरिकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून कडक आदेश दिले आहेत.