खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते १५० दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप

 परिमंडळ अधिकारी  दिनेश नामदेव तावरे यांच्या निगडी कार्यालयात कार्यक्रम संपन्न

कार्यालयातील स्वच्छता व अभिलेख अद्यावतीकरणा बाबत  कार्यालय व कार्यालयाच्या कामकाजा बाबत खासदार बारणे यांनी समाधान व्यक्त......


प्रेस मीडिया लाईव्ह 

पिंपरी चिंचवड दि. १२. निगडी येथील परिमंडल  अ व ज विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री . श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करणेचा कार्यक्रम परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग , संत तुकाराम व्यापार संकुल येथे पहीला मजला येथे आयोजित करणेत आला होता . 

  

   खासदार श्रीरंग बारणे यांनी परीमंडल अधिकारी अवज विभाग निगडी. दिनेश नामदेव तावरे यांचे कौतुक......

या कार्यक्रमास १५० दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते . सदर कार्यक्रमाच्या दरम्यान मावळचे खासदार श्री . श्रीरंग आप्पा बारणे  यांचे हस्ते दिव्यांग यांना शिधापत्रिके मध्ये नाव कमी करणे व वाढविणे इत्यादी बाबत अर्जाचे वितरण करण्यात आले तसेच शिधापत्रिकेचे सुध्दा वितरण करुन लाभ देणेत आला आहे .

तसेच ( आय.एस.ओ. ९००१-२०१५ ) चे कामकाजाबाबत परिमंडळ अधिकारी  दिनेश  नामदेव तावरे यांना मा . डॉ . श्री . राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे , मा . डॉ . श्री . त्रिगुण कुलकणी , उपआयुक्त ( पुरवठा ) पुणे विभाग पुणे व श्री . सचिन ढोले मा . अन्नधान्य वितरण अधिकारी , पुणे सो . यांचे मार्गदर्शन लाभले आहे . 

मावळचे खासदार . श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांनी परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग निगडी या कार्यालयाची ( आय.एस.ओ. ९००१-२०१५ ) चे मानांकनाचे कार्यालयाची पाहणी करुन नागरीकांसाठी बैठक व्यवस्था , पिण्याचे पाणी , सुलभ शैचालय तक्रारपेटी , प्रथमोपचार , दिव्यांग व वयोवृध्द नागरीकां करीता विशेष बैठक व्यवस्था , शिधापत्रिका अर्जदार यांना त्यांचे अर्ज भरणे करीता विशेष व्यवस्था करणेत आली आहे , तसेच शिधापत्रिका संबंधित सर्व अद्यावत माहिती फलक लावणेत आले आहे , ऑनलाईन रेशनकार्ड तपासणी करीता विशेष एक खिडकी योजना चालू करण्यात आलेली आहे . 

तसेच सर्व सामान्य नागरीकां करीता तक्रार नोंदवही , अभिप्राय नोंदवही , कार्यालयीन भेट पुस्तिका सुध्धा ठेवण्यात आली आहे . तसेच नागरीकां करीता बँके प्रमाणे टोकन पध्दतीने शिधापत्रिकेचे कामकाज करणेत येत आहे . तसेच माननीय. खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यालयातील स्वच्छता व अभिलेख अद्यावतीकरणा बाबत त्यांनी कार्यालय व कार्यालयाच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले आहे .

 सदरचे कार्यक्रमास मावळचे खासदार श्री . श्रीरंग आप्पा बारणे साहेब , श्री आनंद बनसोडे , अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना , श्री . राजेंद्र वाघचोरे उपाध्यक्ष प्रहार संघटना पि.चि. , श्री . दत्तात्रय भोसले अध्यक्ष प्रहार संघटना पि.चि. , श्री . सुरेश वाडकर वृक्ष प्रधिकरण सदस्य , सौ . वैभवीताई घोडके , दक्षता समिती सदस्य , पि . चि . श्री ज्ञानेश्वर शिंदे सचिव शिवसेना पि.चि. श्री . योगेश बाबर संघटक शिवसेना पुणे जिल्हा , श्री . शंकरराव अतकरे अध्यक्ष पि.चि. रेशन व्यापारी असो , श्री . धर्मपाल तंतरपाळे- उपाध्यक्ष पि.चि. रेशन व्यापारी असो , श्री . चिंतामणी सोंडकर ऑल महाराष्ट्र फेयदर प्राइज शॉप किपर संघटना , श्री विजयजी गुप्ता खजिनदार ऑल महाराष्ट्र फेयरपाईज शॉप किपर संघटना , श्री गणेश कांबळे व श्री . जय उणेचा , श्री . दिनेशजी तावरे साहेब परिमंडळ अधिकारी अवज विभाग , श्री हेमंत भोकरे , सहा परिमंडळ अधिकारी , अ व ज विभाग , सौ . अनिता शिनगारे , श्रीमती स्नेहल गायकवाड , श्री तुषार नावडकर पुरवठा निरीक्षक अ व ज विभाग निगडी , वैभव धिवार व निखील सोनवणे शिधापत्रिका लिपीक , कल्पना मेचकर , श्री . अमितोज पत्की , श्रीमती रुचिता शेगर , श्रीमती भावना वानखडे आस्थाना लिपीक व श्री गणपत राजे , श्रीराम गायकवाड , माथाडी कामगार कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते .



प्रेस मीडिया लाईव्ह 

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post