नासिक फाटा ते राजगुरू नगर एलिव्हेटेड मार्ग ( उड्डाण पूल) होणार
प्रेस मीडिया लाईव्ह
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड दि १९ नाशिक फाटा ते राजगुरूनगर या २८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर संपूर्ण उड्डाणपूल ( एलिव्हेटेड ) उभारण्यात येणार आहे .पुणे- नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांची माहिती. अंतर केवळ २० मिनिटात पूर्ण करता येणार आहे . त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पिंपरी चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार चाकण परिसरातील वाढते औद्योगीकरण यामुळे दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे . सध्या राजगुरुनगर ते नाशिक फाटा अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तास एवढा वेळ लागतो . मात्र हा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड झाल्यास हे अंतर केवळ २० ते २५ मिनिटातच पूर्ण करता येणार आहे . आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे .
पिंपरी चिंचवड शहर आणि परिसराच्या वैभवात भर पडेल . तसेच वाहतूक कोंडी सुटेल . पुणे नाशिक महामार्गावरील प्रवास सुखद आणि जलद होईल , अशी आशा व्यक्त केली जात आहे .
प्रेस मीडिया लाईव्ह :
(सह संपादक अन्वरअली शेख )