भाजपाला लागलेली गळती निघेना व थांबेना..
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड : दि ४ फेबुर्वारीमहापालिकेतील भाजपच्या थेरगाव येथील नगरसेविका माया बारणे यांनी कार्यकाल संपण्याच्या दहा दिवस अगोदर आपला राजीनामा महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सोपविला आहे. सहा महिन्यापूर्वीच माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे माया बारणे हे राजीनामा देणार हे निश्चित होते. नगरसेविका माया बारणे या थेरगाव मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.अखेर आज माया बारणे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन आपल्या पुढच्या वाटचालीचे संकेत दिले आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने पिंपरी चिंचवड मध्ये आता राजकीय घडामोडींना हळु हळु वेग येऊ लागला आहे , त्यात मुख्य म्हणजे भाजपाला लागलेली गळती निघेना व थांबता थांबेना याचे दुःख सर्वांना होताना दिसत आहे.