पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू

   शहरात महापौर , उपमहापौर , सत्तारुढ पक्षनेते , विरोधी पक्षनेते , विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांचे नाम फलक दिशादर्शक तत्काळ काढण्यात यावेत ...धम्मराज साळवे


प्रेस मीडिया लाईव्ह 

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :पठाण एम एस

पिंपरी चिंचवड दि.१७ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या  नगरसेवकांचा कार्यकाळ  १३ मार्च पासून संपुष्टात आला असून  आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती सुद्धा झालेली आहे . आता महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आलेली असून  सुद्धा पिंपरी चिंचवड शहरात महापौर , उपमहापौर , सत्तारुढ पक्षनेते , विरोधी पक्षनेते , विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांचे जनसंपर्क कार्यालय , निवासस्थान असे दिशादर्शक लावलेले फलक अद्याप काढण्यात आलेले नाहीत .  ही दिशादर्शक फलके तात्काळ काढण्यात यावीत अशी  जोरदार मागणी धम्मराज साळवे एमआयएमचे शहराध्यक्ष यांनी केली आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक राजवट लागलेली असून महापालिकेचे कामकाज सुरू झाले आहे . मात्र शहरात सर्वत्र महापौर , उपमहापौर , सत्तारुढ पक्षनेता , विरोधी पक्षनेते , नगरसेवक , विविध समिती सदस्य , सभापती यांच्या नामफलकांचे फलक जैसे थे आहेत . महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेले आहे .

या शिवाय मागील दहा बारा वर्षातील कित्येक माजी आजी नगरसेवकांचे फलक देखील अद्याप काढलेले नाहीत . हे फलक वर्षांनूवर्षे काढले जात नाहीत . त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात पडतात . या फलकांने शहराचे विद्रुपीकरण देखील वाढले आहे . दरम्यान , शहरात माजी नगरसेवकांचे नामफलक , दिशादर्शक फलक , व अनधिकृतरित्या बसवलेले फलक हे आपण तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत , अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ( एमआयएम ) पक्षाचे साळवे यांनी  केली आहे .


(सह संपादक अन्वरअली)





Post a Comment

Previous Post Next Post