ब्रेकिंग न्यूज : थेरगाव,वाकड,काळेवाडी परिसरातील मुस्लिम दफनभूमीच्या मागणीसाठी महापालिकेच्या दरवाज्यात धडक मोर्चा आंदोलन

 पिंपरी-चिंचवड येथील मुस्लीम समाजाच्या दफनभूमीच्या मागणीला २१ वर्षापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष : कबरस्तान संघर्ष समिती..

मुस्लीम समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नावर प्रेस मीडिया लाईव्ह पाठपुरावा करणार.


प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील थेरगाव, वाकड, काळेवाडी परिसरातील मुस्लिम बांधवांनी स्थानिक नागरिकांनी मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मिळावी म्हणुन महापालिकेला वारंवार निवेदन दिलेली असून, स्थानिक जनप्रतिनिधी आमदार खासदार, तसेच महापालिका आयुक्त यांना वारंवार मुस्लिम दफनभूमीसाठी  जागा मिळणे बाबत पत्रव्यवहार व निवेदने देण्यात आलेली आहेत , तसेच मागील आठवड्यात चक्क महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना 1000 पत्रके पाठवण्यात आले असून मुस्लिम दफनभूमीच्या मागणीला २१ वर्षापासून स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळत नसून आमच्या मागणीला सरळ सरळ वाटण्याच्या अक्षदा लावण्यात येत आहेत . या प्रलंबित मुस्लिम दफनभूमीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जनाजा घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे, असे कबरस्तान संघर्ष समिती यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे व मुस्लीम समाजाला व इतर धर्मीय बांधवांना  देखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.

पिंपरी मार्केट, क्रोमा शोरूम ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रवेद्वार पर्यंत दिनांक २५ मार्च 2022 दुपारी 3.00 वाजता, आंदोलन करण्यात येणार असल्याचे  कबरस्तान संघर्ष समितीने कळविले आहे.

वाकड, काळेवाडी, थेरगाव, डांगेचौक, गुजरनगर, रहाटणी, जगताप डेअरी, पिंपळे निलख या परिसरात मुस्लिम लोकसंख्या आहे. 60,000. सुमारे इतकी आहे, जर मुस्लिम समाजातील वेक्ती मरण पावला तर त्याला दफन करण्यासाठी कब्रस्तान (मुस्लिम दफन भूमी) नाही.  गेल्या २१ वर्षांपासून मुस्लिम समाजातील जबाबदारांनी  प्रशासनाकडे दफनभूमीची मागणी केली आहे. सतत पाठपुरावा करीत आले असून त्यांना निराशाच पदरी पडली आहे. प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत मुस्लिम दफनभूमी मिळालेली नाही.  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३२० आणि ३२१ नुसार, दफनभूमीची व्यवस्था करणे किंवा मुस्लिम समाजासाठी दफनभूमीसाठी राखीव जागा ठेवणे ही पालिकेची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.  मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा हक्क मुस्लिम बांधवांचा हिरावून घेतला असून मानवी हक्कांची पायमल्ली केली जात आहे.  मुस्लिम समाजाला दफनभूमी मिळणे हे घटनात्मक अधिकार आहे,आणि हा अधिकार  मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने कब्रस्तान संघर्ष समितीची नेमणूक करण्यात आली.  कब्रस्तान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वाकड, काळेवाडी, थेरगाव येथील दफनभूमीची लढाई आता सर्वसामान्य जनता व मुस्लिम समाज कायदेशीर लढतआहे.  कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने दफनभूमीच्या मागणीबाबत पिंपरी चिंचवड महापालिका व संबंधित प्रशासनाकडे सतत निवेदने व पाठपुरावा करून सुद्धा दफनभूमी साठी जागा मिळत नाही, प्रशासनाकडून  काहीच निर्णय होत नसल्याने २५ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून पिंपरी मार्केट, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रवेशद्वारा समोर जनजा घेऊन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  पिंपरी चिंचवडमधील सर्व  राजकिय पक्षांनी या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे ही विनंती कब्रस्तान संघर्ष समितीने केले आहे.   मागील २१ वर्षां पासून कब्रस्तानांपासून वंचित असलेल्या थेरगाव,वाकड,काळेवाडी परिसरातील मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या शांतीपूर्ण संविधानिक रित्या आंदोलनात  सहभागी व्हा. अशी कळकळीची विनंती कबरस्तान संघर्ष समिती यांनी यांनी केली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

 ( सह संपादक अन्वरअली )

Post a Comment

Previous Post Next Post