राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने विकासाच्या मुद्यांवर राजकारण करावे : आमदार महेश लांडगे



प्रेस मीडिया लाईव्ह 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नुकताच महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत आमदार लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 15 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सत्तेत होती. 2017 पासून भाजपा सत्ताधारी आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वोतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात आम्ही शहरवासीयांना आधार देण्याची भूमिका ठेवली आहे. 

 भाजपा आगामी निवडणूक पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताची आणि शाश्‍वत विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.भ्रष्टाचाराच्या मुद्यावरच निवडणूक लढायची असेल, तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातील अनेक प्रकरणे भाजपाकडे आहेत, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post