इंधन दरवाढ रोखण्यासाठी दर महिन्याला निवडणूका घ्या...सुप्रिया सुळे
प्रेस मीडिया लाईव्ह :
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच इंधन तसेच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ आज विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महागाईचा निषेध करणारे फलक घेत वेलमध्ये धाव घेतली. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी बारा व त्यानंतरही काही वेळासाठी तहकूब करावे लागले. केंद्र सरकारच्या महागाईधार्जिण्या भूमिकेचा विरोध करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहांतून सभात्यागही केला.
या सरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमताने विजयी केले. पण निवडणूका संपताच या सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. त्यामुळे आता दर महिन्याला निवडणुका घ्या, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लगावला.