, पेन ड्राईव्हची काही टेस्ट ट्यूब बेबी काढली आहे का...शिवसेना खासदार संजय राऊत

टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे... नवनीत राणा..


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  पेन ड्राईव्ह प्रकरणा वरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी     विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आज आरोप करत त्यांना "नुसतं बोंबलून चालतं का...?  रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतोय. रोज काढतायत, पेन ड्राईव्हची काही टेस्ट ट्यूब बेबी काढली आहे का...?" असा तिखट सवाल संजय राऊतांनी केला आहे. त्या वरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांना  जोरदार टोला लगावला आहे. "टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे. त्यामुळे पेन ड्राईव्हला टेस्ट ट्यूब बेबीचे नाव दिले जात आहे, असे राणा यांनी म्हंटले.

नवनीत राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका आलेली आहे. त्यांनी पेन ड्राइव्ह टेस्ट ट्यूब बेबी आहे का ? असा सवाल केला आहे. याबाबत सांगायचे झाले तर महाराष्ट्र राज्यात सुडाचे राजकारण चालू आहे.


Post a Comment

Previous Post Next Post