यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढू लागल्या

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाल्याने खळबळ

प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई : यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांच्या  व्यवहाराची पोलखोल झाली आहे.मातोश्री'ला 50 लाखांचं घड्याळ पाठवलं, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील 'मातोश्री' हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचं म्हटलं आहे.

आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराचं नावही 'मातोश्री' आहे. त्यामुळे या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झालं नसल्याचं कळतंय.आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाकडून करण्यात आलेली कारवाई शिवसेनेसाठी धक्का समजली जात आहे.

जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.या मध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत.किरीट सोमय्यांनी केला होता मनी लॉण्ड्रिंगचा आरोप -भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारील महिन्यात यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटलं होतं.




Post a Comment

Previous Post Next Post