ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे , ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये.... मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले . आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे गुढीपाडवा सणा दिवशी शोभायात्रां मध्ये कसली आडकाठी येणार नसून धुमधडाक्यात हा सण आता साजरा करता येणार आहे. रमजानला सुद्धा मिरवणुका काढण्याचे मुभा देण्यात आली आहे. ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे , ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये. याचाच अर्थ मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा असं ट्विट करत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्य अनलॉक झालं आहे. कोणतेही निर्बंध आता राज्यात असणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.