प्रेस मीडिया लाईव्ह :
गणेश राऊळ : ( उपसंपादक )
मुंबई: ०१ मार्च: मॅनेजमेंट गुरु, दानशूर, समाज भूषण, श्रीमान भागोजी शेठ कीर यांची जयंती - पुण्यतिथी महाशिवरात्रीला देशभरात पार पडली.
त्यांच्या स्मरणार्थ दर वर्षी मुंबईमध्ये बंगाल केमिकल वरळी ते कै भागोजी शेठ कीर स्मारक शिवाजी पार्क या मार्गावर भव्य दिव्य पदयात्रा भागोजी शेठ किर स्मृती समितीतर्फे निलेश करंगुटकर यांच्या संयोजनातं पार पडली. यावेळी भागोजी शेठ कीर यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती त्यात विविध मान्यवरांनी भागोजी शेठ कीर यांच्या विषयी आपले विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. भागोजी शेठ कीर यांनी मुंबईत विविध ठिकाणी प्रसिध्द असलेली बांधकामे केलीत. जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झालेले तेव्हा त्यांना दफन करण्यासाठी त्यांनी आपली मालकीची जागा बाबासाहेबांचे गुरु सीताराम केशव बोले (सी. के. बोले) यांच्या सांगण्यावरून दान केली होती आज त्या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.