109 संशोधक विद्यार्थ्यांना विनाविलंब अधिछात्रवृत्ति मिळावे

  या मागणीसाठी बार्टी कार्यालय पूणे येथील आंदोलनाला जनसंघर्ष क्रांती मोर्चाचा जाहीर पाठिंबा.

प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन  अधिछात्रवृती (BANRF) -2019 / 2020 सरसकट उर्वरित 109 सर्व संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ति देण्यात यावी याबाबत संशोधक विद्यार्थ्याने वेळोवेळी निवेदन देऊन ही बार्टी कार्यालयाने 509 पैकी 400 संशोधक विद्यार्थ्यांची निवड केली त्यामुळे उर्वरित 109 संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमोर अधि छात्रवृति मिळावी त्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी उपोषणाला बसले होते. 

 प्रशासनाने उपोषणकर्त्यांना  पत्र देऊन उपोषणा पासून परावर्तित केले त्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला सामाजिक न्याय मंत्री यांनी 109 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर केले हा धागा पकडून बार्टी महासंचालकांनी 15 ते 20 मार्च पर्यंत रीतसर यादी व घोषणापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल व तुमची प्रक्रियाही चारशे संशोधक विद्यार्थ्यासोबत होईल असे अभिवचन देऊन उपोषणाला बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना परावृत्त केले होते दिनांक 21 मार्च 20 22 रोजी बार्टी प्रशासनाने व सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही बार्टीने यासंदर्भात आजतागायत कोणत्याही नियामक मंडळाची बैठक घेतली नाही त्यामुळे संशोधक विद्यार्थ्याबाबत होणाऱ्या वेळ काढू विलंबामुळे पुन्हा तिसऱ्यांदा बार्टी कार्यालय समोर 23 मार्च 2022 अमरण उपोषणास बसले आहेत या अमरण उपोषण आंदोलनाला जनसंघर्ष क्रांती मोर्चाचा जाहीर पाठिंबा संतोष आठवले प्रकाश इंगळे समीर विजापुरे यांनी बार्टी कार्यालया समोरील उपोषणस्थळी जाऊन उपोषण कर्त्याना देण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post