प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहेपुणे जिल्ह्यातील शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमीत्त उपस्थित कार्यकर्त्यांना भिडे गुरुंजींनी संबोधित केलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भिडे गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होणारं वक्तव्य केलं आहे.
भिडे गुरुजी म्हणाले कि, इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू आहे असं म्हणत भिडे गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यानंतर यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत इम्तियाज जलील म्हणाले की, अशा प्रकारचा माणूस गुरुजी होऊ शकत नाही. लोकांना चांगले ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण गुरुजी म्हणतो. अशा लोकांना आपण गुरुजी म्हणत नाही. तसेच अजमल कसाब नावाचा एक दहशतवादी होता ज्याने आपल्या देशावर हल्ला केला होता. बंदुकीच्या जोरावर आपल्या देशाला कमकुवत करण्याचा उद्देश त्याचा होता. पण संभाजी भिडें सारखी लोक बंदुकीचा वापर करत नाहीत. तर जिभेचा वापर करतात, असेही जलील म्हणाले.