काँग्रेस मधील अंतर्गत कलह समोर ..

 कोण आहेत जी  २३ मध्ये नेते ..?  वाचा सविस्तर...


प्रेस मीडिया लाईव्ह :

काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची चर्चेला उधाण आले आहे.काँग्रेसला पूर्ण वेळ सक्रिय अध्यक्ष मिळावा, संघटनात्मक पातळीवर नवीन फेरबदल करण्यात यावेत अशी मागणी जी २३ गटाकडून करण्यात येत आहे.या मूळे काँग्रेस मधील अंतर्गत कलह समोर आल्याचं दिसून येतं आहे.

दोन दिवसांपूर्वी या गटाने सोनिया गांधींच्या उपस्थितीत एक बैठक घेतली होती. आजही या गटाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझादांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. हा गट सातत्याने बैठका घेत असून काँग्रेस मध्ये फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला एक प्रकारचे आव्हान या गटाकडून देण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोण आहेत जी  २३ मध्ये नेते ..?

१-गुलाम नबी आझाद
२-कपिल सिब्बल
३-शशी थरुर
४-मनिष तिवारी
५-आनंद शर्मा
६-पीजे कुरियन
७-रेणूका चौधरी
८-मिलिंद देवरा
९-जतिन प्रसाद
१०-भूपेंद्र सिंह हुडा
११-राजिंदर कौर भट्टल
१२-एम विराप्पा मोईली
१३-पृथ्वीराज चव्हाण
१४-कौलसिंह ठाकुर
१५-अजय सिंह
१६-अरविंद सिंह लव्हली
१७-राज बब्बर
१८-कुलदीप शर्मा
१९-संदीप दीक्षित
२०-योगेंद्र शास्त्री
२१-विवेक तंखा
२२-मुकुल वासनिक

यातील अनेक नेत्यांनी केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव नेते आहेत जे जी २३गटाचे सदस्य आहेत. मुकूल वासनिकांचे नावही या गटात घेतलं जात होतं. पण नंतर काँग्रेसच्या रचनेत मुकुल वासनिक त्यांचा सामावेश, काँग्रेसच्या संघटन महासचिव पदाची जबाबदारी शिवाय सोनिया गांधींना दैनंदिन कामकाजात मदत म्हणून जी तीन सदस्यीय सल्लागार समिती नेमली गेली त्यातही मुकूल वासनिक आहेत. त्यामुळे आता ते या बैठकांना ते हजर राहत नाहीत.

या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये काँग्रेसला सक्रिय अध्यक्षाची गरज असून त्याची नियुक्ती वेळ वाया न घालवता करावी अशी मागणी केली होती. तसेच पक्षाला सातत्याने येत असलेल्या अपयशावर चर्चा करावी अशीही विनंती त्यांनी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post