दरवाढीच्या वणव्यात सर्वसामान्य जनता अक्षरशः होरपळून निघणार

कमर्शियल सिलिंडरच्या दरवाढीचा हॉटेल-रेस्टॉरंट चालवणाऱ्या व्यावसायिकांच्या खिशावर मोठा परिणाम होणार 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 मंगळवार पासून कमर्शियल एलपीजी सिलिंडर तब्बल 106 रुपयांनी महाग झाला आहे. तसेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दराचाही भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . त्या मुळे या दरवाढीच्या वणव्यात सर्वसामान्य जनता अक्षरशः होरपळून निघणार आहे.

कमर्शियल सिलिंडरच्या दरवाढीचा हॉटेल-रेस्टॉरंट चालवणाऱ्या व्यावसायिकांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 170 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत 1 ऑक्टोबर 2021 रोजी कमर्शियल सिलिंडरची किंमत 1736 रुपये होती. त्या किमतीत नोव्हेंबरमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. पुढे डिसेंबरमध्ये 101 रुपयांची वाढ झाली होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत दर काही प्रमाणात कमी झाले होते. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 6 ऑक्टोबर 2021 पासून स्थिर आहे. यादरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत 102 रुपये डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली. देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका संपताच घरगुती एलपीजी सिलिंडरच्याही दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नव्या दरा नुसार आता 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत 1907 ऐवजी 2012 रुपये, तर मुंबईत 1857 ऐवजी 1963 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात 1987 रुपयांऐवजी 2095 रुपये द्यावे लागतील.  ही दरवाढ मंगळवार  पासून  लागू झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post