बार्टी कार्यालयाने संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांची केली यादी प्रसिद्ध..
प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (BANRF) -2019 / 2020 सरसकट उर्वरित 109 सर्व संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ति देण्यात यावी याबाबत संशोधक विद्यार्थ्याने वेळोवेळी निवेदन देऊन ही बार्टी कार्यालयाने 509 पैकी 400 संशोधक विद्यार्थ्यांची निवड केली त्यामुळे उर्वरित 109 संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमोर अधि छात्रवृति मिळावी यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी उपोषणाला बसले होते प्रशासनाने उपोषणकर्त्यांना पत्र देऊन उपोषणापासून परावर्तित केले त्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला सामाजिक न्याय मंत्री यांनी 109 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर केले हा धागा पकडून बार्टी महासंचालकांनी 15 ते 20 मार्च पर्यंत रीतसर यादी व घोषणापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल व तुमची प्रक्रियाही चारशे संशोधक विद्यार्थ्यासोबत होईल असे अभिवचन देऊन उपोषणाला बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना परावृत्त केले होते दिनांक 21 मार्च 20 22 रोजी बार्टी प्रशासनाने व सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही बार्टीने यासंदर्भात आजतागायत कोणत्याही नियामक मंडळाची बैठक घेतली नाही त्यामुळे संशोधक विद्यार्थ्याबाबत होणाऱ्या वेळ काढू विलंबामुळे पुन्हा तिसऱ्यांदा बार्टी कार्यालय समोर 23 मार्च 2022 पासून अमरण उपोषणास बसले होते .
संशोधक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट विश्रामगृह येथे घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना लेखी पत्राद्वारे संबंधित विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती तात्काळ देण्यात यावी या संदर्भाचा पत्रव्यवहार केला त्यानंतर बार्टी कार्यालयाने 109 संशोधक विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्ति देत असल्याचे संकेतस्थळावरून माहिती प्रसिद्ध केल्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले या आंदोलनात गंगाधर गायकवाड शिरोळ, पंडित कांबळे ,प्रतीक पंचशील ,आश्विनी रणदिवे .उज्वला मगर ,अलका जामकर अस्मिता रुईकर, रागिनी फुले आदी संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाला उपोषणस्थळी जाऊन जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले जनरल सेक्रेटरी समीर विजापूरे यांनीही पाठिंबा दिला होता तर रिपब्लिकन स्टुडंट युनियन अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती भीमयान सोशल फाउंडेशन व जनसंघर्ष क्रांती मोर्चा यांच्यावतीने अमोल वेटम ,दादासाहेब यादव ,अमित वाघवेकर जिवन भालेराव संतोष आठवले यांनी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृति मिळावी यासाठी दिनांक 27 जानेवारी रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन व दिनांक 8 मार्च ते 11 मार्च या कालावधीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषण करण्यात येऊन सामाजिक न्याय विभागाचे अप्पर प्रधान सचिव जयश्री मुखर्जी ,समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांची भेट घेण्यात आली होती सामाजिक न्याय विभागाने याची दखल घेऊन 109 संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृति देण्याचा निर्णय घेण्यात आला