पेट्रोल-डिझेलचे नवीन वाढीव दर जारी

 डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी तर  पेट्रोल मध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली .


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवीन वाढीव दर जारी केले आहेत. नव्या वाढीव दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोल मध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत.

रविवारी ही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. रविवारी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागलं होतं. तर त्यापूर्वी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्यानं तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post