भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोल्हापूर शहर मध्यवर्ती समिती वतीने साजरी होणार !
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : भरत घोंगडे :
कोल्हापूर - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने झालेल्या क्रांतिकारी कोल्हापूर शहराच्या पावन भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीबा जोतिबा फुले यांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याचे कोल्हापूर शहर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने ठरविण्यात आले आहे !
ह्या जयंतीउत्सवाचा प्रारंभ दि. ११ मार्च रोजी क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या जयंती दिनापासून पासून चालू होईल ! यानिमित्ताने अनेक सामाजिक कार्यक्रम नियोजन केले जातील ! असे नियोजन बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे . ही बैठक संग्राम उद्यान टाऊन हॉल येथे ज्येष्ठ आंबेडकरी नेते रमेश भाई कामत यांचे अध्यक्षते खाली झाली .
सदर बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीबा ज्योतिबा फुले जयंती समिती जाहीर करण्यात आली अध्यक्ष - धनाजी सकटे ,उपाध्यक्ष - सौ अंजना जाधव ,सेक्रेटरी - सुरेश कांबळे , खजिनदार - रघुनाथ साठे सन्माननीय सदस्य :- भारत धोंगडे (सदर बाजार ) अरूण घाटगे ( जिवबा नाना पार्क ) रमेश भाई कामत , मंगला दावणे ( लीशा हाॅटेल परीसर ) संजय कांबळे, संजय गोंधळी (विचारे माळ ) दाविद भोरे , आदिनाथ साठे डॉ. माधुरी चौगुले (राजारामपुरी ) गोरख दाभाडे , राजू माने ,(कसबा बावडा ) संजय कांबळे , मल्हार शिर्के ( सिध्दार्थ नगर ) महेश ताटे (आंबेडकर सोसायटी ,विचारे माळ ) सौ.आश्वीनी नाईक ( राजेंद्र नगर ) केशव लोखंडे , विशाल चौगुले , धनाजी कांबळे ( लक्षतिर्थ वसाहत ) सर्व नवनिर्वाचित पदाधिकारीं यांचे माननीय अध्यक्षांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करणेत आले आभार प्रदर्शन गोरख दाभाडे यांनी केले !