क्राईम न्यूज : 15 हजारांची लाच घेताना'महावितरण'चा सहायक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात..


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  'महावितरण'च्या सहायक अभियंत्याला 15 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. धर्मराज विलास काशिदकर (वय 40) असे या सहायक अभियंत्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या कामाची बिले मंजूर करून देण्यासाठी काशिदकर याने प्रत्येक कामासाठी 500 रुपये अशी एक लाखांच्या लाचेची मागणी केली. 23 फेब्रुवारी रोजी ठेकेदाराच्या तक्रारीनंतर झालेल्या पडताळणीत झालेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी 75 हजार नंतर द्या; पण झालेल्या बिलांपोटी 25 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजारांची लाच घेऊन येण्यास सांगितले होते. आज काशिदकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

1 Comments

  1. Casino | DRMCD
    Casino at DrmC. (866) 777-7777. Hotel: 이천 출장샵 Davenport. Casino 속초 출장안마 in 김해 출장샵 the center of 전주 출장마사지 Cincinnati is a one stop casino and 군산 출장샵 a gaming destination that's been providing

    ReplyDelete
Previous Post Next Post