प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सादळे मादळे भागात आज सायंकाळी ट्रॅक्टर ट्रॉली दरीत घसरून झालेल्या अपघातात एक ऊस तोडणी मजूर जागीच ठार झाला.तर २१ मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत जखमीं कडून मिळालेली माहिती अशी की , कोरेगाव (सांगली) भागातील ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी वारणा भागात आले होते. आज कारखान्याचा हंगाम संपला त्यामुळे हे मजूर गावी जाणार होते.परंतु त्यापूर्वी आज रविवार चौथ्या खेट्या निमित्य श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन सादळे मादळे मार्गे जात असताना घाटात ट्रॅक्टर व त्याला जोडलेल्या दोन ट्रॉल्या दरीत घसरून अपघात झाला.
परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाल्या. जखमींना तातडीने सीपीआर मध्ये हलवण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्याने सीपीआर प्रशासनही सज्ज झाले. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. मात्र एका शेतमजुराचा अपघातात जागीच मृत्यू झाला.