कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक पंचरंगी होणार असल्याच स्पष्ट

अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले अभिजित बिचुकले  रिंगणात

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

 कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक  पंचरंगी होणार असल्याच स्पष्ट झालंय. या निवडणुकीत काँग्रेस-भाजपा हे प्रमुख पक्ष आहेत, मात्र करुणा शर्मा आणि अभिजित बिचुकले  रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चर्चेची होणार आहे  हे निश्चित. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुक होणार आहे. जाधव यांच्या मृत्यू नंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी घोषणा काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती, मात्र त्यांचे प्रयत्न निषफळ ठरले आहेत.

कॉग्रेस कडून आमदार चंद्रकांत जाधव  यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणुक रिंगणात असणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून कोण असेल याची उत्सुकता होती. सत्यजित कदम यांच्या रूपाने भाजपाने तगडा उमेदवार मैदानात आणला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजपाचा आमदार नसल्याची खंत चंद्रकांत पाटील  यांना होती ती भरून काढण्यासाठी आता भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेसही कोल्हापूर उत्तर मतदार संघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न  करताना दिसत आहे .

काँग्रेस बरोबरच पंजाब निवडणुकीत सत्ता आल्याने आत्मविश्वास वाढलेल्या आप ही संदीप देसाई यांना रिंगणात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपने तर प्रचाराची पहिली फेरी पूर्ण ही केली आहे. या तिन्ही उमेदवाराबरोबरच करुणा शर्मा या शिवसंग्राम पक्षाच्या वतीने लढणार आहेत, महिलांच्या हक्कासाठी त्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. एवढच नव्हे तर आतापर्यंत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले अभिजित बिचुकले  रिंगणात असणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post