प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कोल्हापूर जिल्ह्यातील मिनीडोअर रिक्षा स्क्रयाप संदर्भात व नवीन सी.एन.जी.गाड्या घेणे संदर्भात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी काटकर यांच्या बरोबर चर्चा करून गाड्यांवर कारवाई न करणे बाबत आश्वासन घेण्यात आले.
यावेळी राजू जाधव कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ मिनीडोअर चालक मालक पंदारे मामा परमाज मामा उस्ताद चाचा व चालक मालक उपस्थित होते. यावेळी वीस वर्षावरील मिनीडोअर रिक्षाचालक यांच्यावर होणारी कारवाई म.न.से.वाहतूक सेनेने थांबवून कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षाचालक यांना मोठा दिलासा दिला व एकाच वेळी शंभर ते दिडशे मिनीडोअर रिक्षा पुण्यातील सी.एन.जी.कंपनीला म.न.से.वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली घेण्याचे ठरविण्यात आले.यावेळी राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्याला जाण्यासाठी सर्व मिनीडोअर रिक्षाचालक यांनी एकमुखी ठराव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या राज्य अध्यक्ष संजय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सर्व निर्णय घेण्याचे ठरविण्याचे मिनीडोअर रिक्षाचालक यांनी ठरविले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मिनीडोअर रिक्षाचालक यांचे राजू जाधव यांनी म.न.से.वाहतूक सेनेवर विश्वास दाखवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले.