प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर: महावितरणचा सहायक अभियंता बील मंजुरीसाठी पंधरा हजार रूपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०, रा.महालक्ष्मी पार्क, हॉकी स्टेडियम परिसर) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.
याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीत त्याने १५ हजार रूपये लाचेची मागणी करून ती घेऊन येण्यास सांगितल्याचे पुढे आले. त्यानुसार विभागाने आज ताराबाई पार्क, ग्रामीण विभाग (२) येथे १५ हजाराची लाच घेतल्यानंतर काही वेळाने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बुधवंत यांनी सांगितले. ही कारवाई उपअधीक्षक बुधवंत, पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर, पोलिस कर्मचारी शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई, रुपेश माने आदींनी केली.