कर्जत मुरबाड रस्त्यावरील दिशादर्शक फलक मध्ये खाजगी रिसॉर्ट ऐवजी हुतात्मा हिराजी पाटील यांचा नाव द्यावा :

 राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर शेळके यांची मागणी..

प्रेस मीडिया लाईव्ह :

नरेश कोळंबे कर्जत 

      कर्जत तालुक्याला भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरणारे मानिवली गावातील हुतात्मा हिराजी पाटील या क्रांतिकारकाचे स्मारक मानिवली येथे असून त्यांच्या नावाचा उल्लेख दिशादर्शक फलकामध्ये  एमएसआरडीसी ने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर शेळके यांनी एमएसआरडीसी कडे केली आहे . 

       कर्जत हून मुरबाड कडे जाणाऱ्या रस्त्यावर कळंब पोही दरम्यान एमएसआरडीसी ने एक दिशादर्शक फलक लावला असून ह्या फलकावर स्वातंत्र्य लढ्यातील वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाचा विसर पडलेला दिसून येत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपले रक्त सांडले आणि बंदुकीच्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलल्या अश्या महान हुतात्म्यांचे विस्मरण एमएसआरडीसी ला होणे हे लाजिरवाणे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पण त्याच जागी एका खाजगी कृषी रिसॉर्ट चे नाव म्हणजेच सगुणा बाग असे लिहिले आहे . यासंबंधी आवाज उठवत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी एमएसआरडीसी तसेच तहसीलदार, डि वाय एस पी कर्जत आणि नेरळ पोलिस स्टेशन  यांना निवेदन देत नावात बदल करून हुतात्मा हिराजी पाटील असे करावे असे सांगितले .

प्रतिक्रिया 

     कर्जत हून मुरबाड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक मध्ये क्रांतिकारकांना डावलून  खाजगी कृषी रिसॉर्ट  चे सगुणा बागचे नाव देण्यात आले आहे . ते बदलून तात्काळ तिथे हुतात्मा हिराजी पाटील असा बदल करण्यात यावा, अशी मागणी मी करत असून येत्या २० दिवसात ह्या फलका मध्ये बदल करण्यात आला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मी देत आहे.

     सागर शेळके (तालुकाध्यक्ष , राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कर्जत)

Post a Comment

Previous Post Next Post