सरकारने कोरोना काळातील आशा वर्करच्या कामाचा मोबदला देऊन महिलांचा सन्मान करावा: चित्रा ताई वाघ




प्रेस मीडिया लाईव्ह :

कर्जत  - नरेश कोळंबे 

   कोरोना काळात स्वतः चा  जीव धोक्यात घालून  गोरगरीबांचे   जीव वाचावणाऱ्या आशा  वर्कर यांचे ३५ रुपये  प्रति दिवसाचे  मानधन  देऊन तरी  महिलांचा  सम्मान सरकारने करावा,  तरच  महिला  दिन  साजरा करण्यात अर्थ आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला  मोर्चा च्या चित्रा ताई वाघ यांनी नेरळ मध्ये केले. 

            कर्जत तालुका आणि  नेरळ  शहर  यांचे  वतीने  जागतिक महिला  दिनाचे औचित्य साधून ७ तारखेला तालुक्यातील कर्तृत्ववान महिला  आणि आशा  वर्कर यांचा  सम्मान  सोहळा नेरळ  येथे आयोजित केला होता. महाराष्ट्रप्रदेश  उपाध्यक्ष चित्रा ताई वाघ  यांच्या हस्ते कर्तृत्ववान  महिला  आणि आशा  वर्कर  यांचा सम्मान पत्र  आणि साडी देऊन सम्मान करण्यात आला. 

        यावेळी चित्रा ताईंनी राज्य सरकारला महिलांबाबत  काहीतरी वाटत असेल तर त्यांनी आशा वर्कर यांचा  कोरोना काळातील कामाचा ३५ रुपये प्रति दिन भत्ता  त्वरित द्यावा, तरच  महिला  दिन साजरा  करण्यात अर्थ आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. परंतु हे निद्रिस्त सरकार महिलांना न्याय देऊ शकत नाही, रोज वेगवेगळ्या भागांत  अल्पवयीन मुली पासून वृद्ध महिलांवर  बलात्कार होत आहेत आणि सरकार  त्यां आरोपी च्या बाजूने उभे  राहत आहे, अश्या सरकार चा निषेध करू तेवढा कमी आहे. भविष्यात होणाऱ्या आरोग्य  सेवा भरतीत  आशा वर्कर यांना प्राधान्य देऊन त्यांना सामावून घ्यावे त्यासाठी भारतीय जनता  पार्टी तुमच्या पाठीशी  ठामपणे  मागे उभी  राहील असे त्यांनी सांगितले.

      यावेळी सर्व आशा वर्कर अतिशय  आनंदी होत्या आपल्या कामाची  दाखल  घेऊन  आपल्या पाठीवर  कौतुकाची  थाप  कोणीतरी  देत आहे, ही भावना  आशा वर्कर च्या प्रमुख  यांनी बोलून दाखविली.  त्यांनी चित्रा ताईचे  विशेष  आभार मानून आमच्या  कामाची  दखल  घेतल्या बद्दल  महिला  तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे  आणि  नेरळ महिला अध्यक्ष नम्रता  कांदळगावकर  यांचे  आभार मानले. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला  जिल्हा अध्यक्ष अश्विनी ताई पाटील यांचेसह  प्रदेश जिल्हा  तालुका महिला  पदाधिकारी ,  नरसेविका , ग्रामपंचायत सदस्य  आणि अनेक महिला  कार्यकर्त्यां तसेच  पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post