उपोषणास माहिती अधिकार संरक्षण समितीसह विविध संघटनांचा पाठिंबा.
कबनूर उरुस कमिटीच्या पाळणा - गाळे दरवाढ विरोधात कुंदन आवळे व फिरोज फकीर यांनी कबनूर दर्ग्यासमोर आज सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणाला माहिती अधिकार संरक्षण समिती , बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद यासह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला.
कबनूर ग्रामपंचायत व उरुस कमिटीने पाळण्यांसह मनोरंजनाच्या खेळाचे साहित्य व विविध वस्तू विक्रीसाठी लावण्यात येणाऱ्या गाळेधारकांसाठी जादा दरवाढ केली आहे.त्यामुळे याचा फटका उरुसामध्ये येणाऱ्या सर्वसामान्यांच्या आर्थिक खर्चाला बसणार आहे.यामध्ये व्यापा-यांकडून पाळण्याचे दर हे प्रति व्यक्तीसाठी ६० रुपये लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे.तर गाळेधारकांना देखील जादा भाडेवाढ आकारण्यात येणार असल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी माहिती अधिकार संरक्षण समिती, बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कबनूर उरुस कमिटीने पाळणा - गाळे दरवाढ कमी करावी ,या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालय ,अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय ,अप्पर तहसील कार्यालय तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्यास देण्यात आले होते.तरी देखील याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.परिणामी ,कबनूर उरुस कमिटीच्या पाळणा - गाळे दरवाढी विरोधात कुंदन आवळे व फिरोज फकीर यांनी कबनूर दर्ग्यासमोर आज सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले.यावेळी उपोषणकर्त्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कबनूर ग्रामपंचायत व उरुस कमिटीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या उपोषणाला माहिती अधिकार संरक्षण समिती , बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद यासह विविध सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केला.यामध्ये माहिती अधिकार संरक्षण समितीचे राज्याध्यक्ष सलिम शेख , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर जाधव ,कलावती जनवाडे ,लिलावती खोत ,विद्या पोवार , बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील , विश्व हिंदू परिषदेचे शांतीनाथ कामत , राहुल महालिंगपूरे ,प्रशांत जगताप,रवी धनगर , संतोष मुरदुंडे , अजित खुडे , युवराज कांबळे ,रवि कांबळे यांच्यासह विविध संस्था ,संघटना व नागरिकांचा समावेश होता.