प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. २३ माणसाने विवेकनिष्ठ जगणे सोपे नाही. अंधविश्वासापासून समाधान किंवा आधार मिळवणे सोपे आहे. परंतु निरंतर विवेकनिष्ठ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे.असे म्हणणारे शहीद भगतसिंग हे सामाजिक व राजकीय क्रांतीचा ज्वालामुखी होते. शहीद भगतसिंग ,सुखदेव व राजगुरू यांनी मानवाकडून मानवाचे होणारे शोषण होऊ नये यासाठी आपले बलिदान दिले.
या शहिदांच्या विचारावर वाटचाल करणे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा व भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान यांची प्राणपणाने जोपासना करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.तीच शाहिदांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने शहिदांना अभिवादन करताना बोलत होते.प्रारंभी शहिदांच्या प्रतिमेला ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रफिक सूरज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी डॉ.रेवती रुकडे,रमेश कांबळे,संदीप धुमाळ, राजू देशींगे,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी ,विष्णू जाधव आदी उपस्थित होते.