प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी : शहरात गेल्या दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी पुरवठा. सुरू झाला आहे खरा पण कमी दाबा मुळे नागरिकांना पाणी मिळत नाही , पाण्यासाठी येथील महिलांना पाय पीठ करावी लागत आहे , पाण्याची टाकी उशा जवळच आहे, पण घश्याला कोरड कायम आहे.
या बाबत जवाहरनगर येथील साई समर्थ गल्ली नंबर दोन मधून आमच्या प्रतिनिधीला मिळालेली माहिती अशी की , पाण्याच्या टाकीवरून काही भाग मध्य रात्री पाणी रात्र भर सोडून टाकी पुर्ण रिकामी केली जाते , आणि आमचा भागात पाणी फिल्टर पंप सुरू करून सुरू केले जाईल असे सांगण्यात येते . नंतर सांगीतले जाते तुमच्या भागात लाईट गेली आहे त्या मुळे पाणी कमी दाबाने येते असे सांगण्यात येते . या बाबत इनपाचे प्रशासक यांनी या संपूर्ण पाणी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी या भागातील त्रस्त नागरिक करत आहेत. पाणी पुरवठा अधिकारी फोन उचलत नाहीत , हे सर्व आपल्या पालिकेत काय सुरू आहे या कडे आपण लक्ष दिला तर बरे होईल