प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र कामगार सेना या संघटनेच्या वतीने शुक्रवार १ एप्रिल रोजी रक्तदान ,मोफत आरोग्य तपासणी शिबिर व समाधान वृद्धाश्रमात धान्य वाटप , कामगार मेळावा असे विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येणार आहेत.हे सामाजिक उपक्रम संघटनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी दिली.
इचलकरंजी शहर ही कष्टक-यांची नगरी म्हणून ओळखली जाते.याठिकाणी यंञमाग उद्योग व त्याच्याशी निगडित उद्योगांमुळे अनेक रिकाम्या हातांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.असे असले तरी ब-याचदा भांडवलदार मालक वर्गाकडून कामगारांवर अन्याय करण्याचे प्रकारही घडत असतात.त्यामुळे अन्यायग्रस्त , पिडीत कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते राजेंद्र निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून १६ वर्षांपूर्वी महाराष्ट्र कामगार सेना या कामगार संघटनेची स्थापना करुन त्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन ,मोर्चे काढून
यंञमाग व इतर क्षेञातील कामगारांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळे या संघटनेच्या कार्यपध्दतीबद्दल कामगारांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला आहे.या संघटनेचा शुक्रवार १ एप्रिल रोजी १६ वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.यामध्ये लिगाडे मळा येथे संघटनेच्या कार्यालयासमोर सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर , सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर , सकाळी ११ वाजता समाधान वृद्धाश्रमात धान्य वाटप , दुपारी ४ वाजता कामगारांचा मेळावा असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.यावेळी मनसे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव ,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजानन जाधव , सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव , उद्योगपती शहाजहान शिरगांवे ,माजी नगरसेवक राजू बोंद्रे ,माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते ,माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे ,माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी , सामाजिक कार्यकर्ते प्रदीप धुञे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे , असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले.
यावेळी संघटनेचे संघटक राहुल दवडते , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सद्दाम मुजावर , सचिव सचिन बिरांजे , उपाध्यक्ष केंपान्ना हालगेकर , उपाध्यक्ष सुर्यकांत लोंढे , तालुकाध्यक्ष इम्तियाज शेख , शहराध्यक्ष मेहबूब गवंडी यांच्यासह पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते.