चंदूर येथे रविवारी राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी /प्रतिनिधी

चंदूर  येथील विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय चंदूर व कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार 6मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.एकूण तीन सत्रात होणार्‍या या संमेलनात राज्यभरातून नामांकित साहित्यिक,लेखक, कवी,कवियत्री, व्याख्याते उपस्थित राहणार आहेत.

 चंदूर येथे रविवारी सकाळी दहा वाजता महासिध्द मंदिर कार्यालयात संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.पहिल्या सत्रात साहित्यिक व मान्यवरांचे मार्गदर्शन व कथाकथन तर दुसर्‍या सत्रात राज्यभरातील विविध लेखकांना पुरस्कार वितरण व परिसंवाद तर अखेरच्या सत्रात निमंत्रित 50 कवींचे काव्यसंमेलन असा कार्यक्रम होणार आहे.संमेलनात प्रमुख पाहुणे आम.प्रकाश आवाडे,जि.प.सदस्य डॉ.राहुल आवाडे,स्वप्निल आवाडे,पं.स.सदस्य महेश पाटील,सरपंच सौ.अनिता माने,लेखक डॉ.महावीर अक्कोळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 सकाळच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान प्रसिध्द साहित्यिक प्रा.किसनराव कुर्‍हाडे हे भूषवणार असून उद्घाटन गंगाखेड पुणे येथील कवियत्री श्रीमती संगीताताई जामगे यांच्या हस्ते होणार असून खानापुर येथील प्रा.शांतीनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे.दुसर्‍या सत्रातील मी व माझी ग्रंथसंपदा या विषयावरील परिसंवादामध्ये लॉकडाऊन कादंबरीचे लेखक डॉ.श्रीकांत पाटील,प्रा.सुरेश कुर्‍हाडे ,लेखक मनोहर भोसले,गझलकार सिराज शिकलगार हे सहभागी होणार आहेत.तिसर्‍या सत्रात सांगोला येथील कवयित्री सौ.श्‍लेषा कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या काव्यसंमेलनात निमंत्रित 50 कवी सहभागी होणार आहेेत.यामध्ये अ‍ॅड.विजय कांबळे(मुंंबई), मलेखा शेख(सिन्नर),अशोक पवार(कडेगाव) डॉ.रामचंद्र चोथे(अकिवाट),मधुकर हुजरे (उस्सानाबाद),अमोल साबळे (सोलापूर)  सौ सिंधू काळे (सोलापूर)ऋजुता माने (मिरज) ,गीतकार प्रा.नौबत कोलप (सांगली)आदी कवींचा समावेश आहे.याप्रसंगी राज्यस्तरीय प्रेरणा कादंबरी पुरस्कार, राज्यस्तरीय प्रेरणा साहित्यरत्न पुरस्कार,उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने  विविध मान्यवरांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती या संमेलनाचे आयोजक कवी सरकार,साहित्य संमेलन कमिटीचे अध्यक्ष बळीराम कदम, उपाध्यक्ष बाबा जाधव,कार्याध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.तरी या संमेलनास पंचक्रोशीतील सर्व साहित्यप्रेमी वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संमेलन कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post