इचलकरंजीच्या शहरवासियानां पाण्याच्या प्रश्नाचे निराकरन न झाल्यास पाणी लढा कृती समीती दिर्घ जनलढा सुरु करणार..
प्रेस मीडिया लाईव्ह
मनु फरास :
इचलकरंजीच्या नागरिकांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यात होत असलेल्या दिरंगाई, विस्कळितपणा आणी कायमस्वरुपी तोडगा काढणे संदर्भात. प्रांताधिकारी विभागीय कार्यालया मध्ये नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
इचलकरंजी हे एक महाराष्ट्रातील आघाडीचे औद्योगिक शहर असल्याचे आपण जाणताच. या ऊद्योग व्यवसायामुळे इचलकरंजीत कामगार वर्ग आणी मालक व्यापारी ऊत्पादक अनुषंगाने येणार्या सर्वच संबधीत घटक हे देशाच्या अर्थव्यवस्थेला कररुपात आपआपले योगदान निश्चितच देत आलेले आहेत. गावाच्या विकासाबरोबरच लोकसंख्याही त्याप्रमाणात वाढत गेली आज अंदाजे साडेतीन लाख लोकवस्तीचे शहर म्हणुन इचलकरंजी नावारुपाला आलेली आहे.वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत जाणारे शहरीकरण आणी नागरीकांच्या वाढत्या गरजा पुरविण्यात प्रशासन अपुरे पडत असल्याचे गेल्या पाच दहा वर्षापासुन वारंवार दिसुन येत आहे.
या शिवाय इचलकरंजीला शेजारी पंचगंगा नदी असुनसुद्धा आपण ते पाणी वापरु शकत नाही हे ही ऊघड झालेले आहे. पंचगंगेचे झालेले प्रदुषण हा एक मोठा अवरोध शहराच्या विकासाच्या आड येत आहे. गेल्या तीस वर्षापासुन आम्ही इचलकरंजीकर वेगवेगळ्या समस्यानां तोंड देत पुढे जायचा प्रयत्न करीत आहोत. त्यातील सर्वात प्रमुख प्रश्न म्हणजे इचलकरंजीकरानां पिण्याचे शुद्ध आणी मुबलक पाण्याची गरज असतानां ते मिळत नाही आहे.पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनीधी निवडुन येत असतात. आमदार खासदार नगरसेवक हे वेगवेगळी अश्वासने सतत देत असतात, परंतु वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा आणी ऊद्घाटन या व्यक्तीरीक्त प्रत्यक्ष पाणी जनतेच्या पदरात पडलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
सध्यातरी पाच सहा दीवसानीं अपुरा पाणीपुरवठा शहराला होत आहे. काही ठीकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतो तर काही ठीकाणी जास्त दाबाने होतो. रोजची दिनचर्या पार पाडण्यासाठी सुद्धा पाणी ऊपलब्ध होत नाहीय. अंघोळीचे तर सोडा शौचालयाला जाण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नाहीय. आजुबाजुला नद्यांचे जाळे असुनसुद्धा इचलकरंजीकरांची अवस्था ही लातुर उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भागाप्रमाणे झालीय हे नाकारु शकत नाही.
प्रशासन यात निश्चितपणे कमी पडतेय हे ऊघड सत्य आहे.एप्रिल मे महीन्यात तर भीषण परीस्थिती निर्माण होऊ शकते. इचलकरंजीकर या परिस्थितीला वैतागले आहेत. गावाला कुणीच वाली नाही का? हा प्रश्न सोडवण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाहीयत. वर्षाची पाणीपट्टी मात्र गाजावाजा करुन प्रशासन वसुल करीत आहे. पाणीपट्टी वसुल करता तशी पाणी द्यायची जबाबदारी नाही का?
365 दिवसापैकी 90 दीवसच पाणी पुरवठा शहराला होत असतो.या प्रश्नावरुन नागरिकांची सहनशीलता संपुन कधी ऊद्रेक होईल हे सांगता येत नाही.सबब वरिष्ठ पातळीवरुन लक्ष घालुन या समस्येचे निराकरन तातडीने व्हावे अशी नागरिकांची भावना आहे. या पाणीप्रश्नावर एक श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी इचलकरंजी पाणी लढा कृती समीतीची मागणी आहे.
सदर कृती समीतीत सर्व सामान्य नागरीकच आहेत कुणीही लोकप्रतिनीधी वा राजकारणाचा या समीतीचा संबध नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी.लौकरच शहर वासियानां पाण्याच्या प्रश्नाचे निराकरन न झाल्यास पाणी लढा कृती समीती दिर्घ जनलढा सुरु करत आहे याची दखल घेऊन तातडीने प्रश्न सोडवण्यात यावा .