प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी नगरपरिषदेची सन २०२१-२२ सालाची घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. घरफाळा वसुली साठी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर अधिकारी अरिफा नुलकर आणि कर निरिक्षक स्वप्निल बुचडे यांच्या नियंत्रणाखाली घरफाळा वसुली साठी नगरपरिषदेच्या विविध विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली एकुण ५ भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.
नगरपरिषदेकडुन शनिवार-रविवार अशा सुट्टी दिवशी सुद्धा वसुली सुरू राहणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील सर्व पथक प्रमुख तसेच पथकातील कर्मचाऱ्यांच्या काल झालेल्या बैठकीत थकीत घरफाळा, पाणी पट्टी तसेच नगरपरिषद गाळ्यांच्या वसुलीसाठी डॉ. ठेंगल यांनी जप्तीची कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने आज दि.५ मार्च रोजी *हेमलता साळुंखे (काजल टेक्स्टाईल) यांच्या वॉर्ड क्रमांक १ घर क्रमांक ५१५/३/२/१ आणि ५१५/३/२ या मिळकतीच्या रु. १६०८०३ /-* इतक्या रकमेच्या थकित घरफाळा पाणी पट्टी वसुली साठी सदर मिळकत नगरपरिषदे कडुन सिल करणेत आली.
नगरपरिषदे कडुन थकित घरफाळा आणि पाणी पट्टी वसुलीसाठी अशा प्रकारची जप्तीची कारवाई यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे तसेच जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांची नावे शहरातील मध्यवर्ती चौकात तसेच वृत्त पत्रातून प्रसिद्ध केली जाणार असल्याने शहरातील मिळकत धारकांनी आपला घरफाळा,पाणी पट्टी आणि गाळेधारकांनी आपले भाडे भरून जप्ती सारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांचेकडून करणेत येत आहे.