कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या मागणीचे आमदार आवाडेंना निवेदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज रविवारी इचलकरंजीत ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ , वेतनश्रेणी लागू करावी ,निव्रुत्तीनंतर पेन्शन मिळावी यासह विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्नांवर विधानसभेत वेतनश्रेणी, वेतनवाढ व पेन्शन इत्यादी प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने पुढाकार घेवून प्रत्येक आमदारांना निवेदन देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सदर निवेदन हे १ मार्च ते ११ मार्च या कालावधीत राज्यातील सर्व आमदारांना देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी मतदार संघातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या शिष्टमंडळाने आज रविवारी इचलकरंजीत ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ , वेतनश्रेणी लागू करावी ,निव्रुत्तीनंतर पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सद्यस्थितीत राज्यात अंगणवाडी सेविकांना दरमहा
८ हजार ३२५ रुपये,मिनी अंगणवाडी सेविकांना ५ हजार ९७५ रुपये तर मदतनीसांना ४ हजार ४२५ रुपये इतके तुटपुंजे मानधन दिले जाते. हे मानधन किमान वेतनापेक्षा कमी आहे. त्यामुळे या तुटपुंज्या मानधनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे तातडीने मानधनामध्ये वाढ करणे व त्यांना वेतन लागू करण्यासाठी सरकारने निर्णय करावा ,अशी मागणी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी आमदार आवाडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करु ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.त्यांच्यासमवेत ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे , सुनील पाटील ,बाळासो कलागते , सर्जेराव पाटील , नरसिंग पारीख , सचिन हेरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक धोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे ,गंगुताई माने,सुजाता गायकवाड,लता कांबळे,रेखा जगताप,कांचन मालवे,प्रमिला सावंत, अनिता बारवाडे, सुमती शिंदे ,अश्विनी खानाज,अंजना खानाज ,सुवर्णा थोरात यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा समावेश होता.